You are currently viewing कोकण इतिहास परिषदेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

कोकण इतिहास परिषदेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

*कोकण इतिहास परिषदेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन*

वैभववाडी

कोकण इतिहास परिषदेचे १३ वेळ वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने कोकण इतिहास परिषदेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा व रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणचा सर्वांगीण इतिहास ज्ञात होण्यासाठी व हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने २ ऑक्टोबर, २०१० रोजी ठाणे येथे कोकण इतिहास परिषदेची स्थापना करण्यात आली. कोकण इतिहास परिषदेची आतापर्यंत १२ वार्षिक राष्ट्रीय अधिवेशने यशस्वीपणे संपन्न झाली आहेत. कोकण इतिहास परिषदेचे १३ वे राष्ट्रीय अधिवेशन शनिवार दिनांक १० फेब्रुवारी, २०२४ रोजी कणकवली महाविद्यालयात आयोजित केले आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
१)निबंध स्पर्धा-
विषय- स्थानिक इतिहास
(स्थानिक व्यक्ती, ऐतिहासिक घटना, देव देवता, जत्रा किंवा उत्सव इत्यादी.) शब्दमर्यादा ४५० ते ५००
निबंध स्पर्धेच्या सर्व नियमांचे पालन करण्यात यावे.

२)चित्रकला स्पर्धा-
जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील एखादी जुनी ऐतिहासिक वास्तू, मंदिर किंवा गड-किल्ला इत्यादी.
चित्रकलेसाठी सफेद २८ × २२ इंच कार्डसीट पेपरच्या वापर करावा.

३)रांगोळी स्पर्धा-
विषय- भारतातील क्रांतिकारक, देशभक्त, राष्ट्रीय व्यक्ती किंवा समाज सुधारक. स्पर्धकांनी दि.९ फेब्रुवारी रोजी कणकवली काॅलेजमध्ये येऊन रांगोळी काढावी. सर्व साहित्य स्वतः घेऊन यायचे आहे.
वरील तिन्ही स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रोख रुपये ५००/-, ३००/- व २००/- व प्रमाणपत्र देऊन कोकण इतिहास परिषदेच्या कणकवली येथील अधिवेशनात गौरविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील अधिकाधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष श्री.सदाशिव टेटविलकर व कार्यवाह डॉ.विद्या प्रभू यांनी केले आहे.
स्पर्धकांनी आपले निबंध व चित्रकला पोस्टर दि. ३० जानेवारी पर्यंत डॉ.सोमनाथ कदम, इतिहास विभाग प्रमुख, कणकवली काॅलेज, कणकवली येथे जमा करावेत.
अधिक माहितीसाठी प्रा.श्री.एस. एन.पाटील (9834984411) व डॉ.सोमनाथ कदम (9423731382) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा