You are currently viewing परतीची वाट

परतीची वाट

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या, सावित्रीची लेक, नेशन बिल्डर, आदर्श शिक्षिकापुरस्कार प्राप्त कवयित्री लेखिका सौ सुजाता पुरी यांची अप्रतिम काव्यरचना

मृत्युने ही दिली असती एखादी संधी
परतवले असते प्रियजनांचे प्राण
तेव्हा कळाली असती किंमत
परतून आलेल्याचा ठेवला असता मान

खरे जीवन काय असते
याचा कळला असता अर्थ
शब्दांनी दुखवणे समोरच्याला
तेव्हा वाटले असते व्यर्थ

कळाले असते वेळेचे भान
आणि त्यात जगण्याचा आनंद
आपल्या माणसाला जपले असते वेळीच
आणि जोपासला असता त्यांच्या वरच्या प्रेमाचा छंद

मागितली असती किती तरी चुकांची माफी
झालेल्या जखमांना भरून काढण्यासाठी
प्रेमाचे शब्दच असतात काफी

अंतरयामी गवसला असता सुर
नव्या जगण्याचा
हट्ट आणि महत्वाकांक्षा यापेक्षा
घेतला असता वसा मायेचा

मृत्यु देईल संधी
याची तरी का पाहावी वाट
हेवे दावे विसरून ,घट्ट करावी
आपल्या माणसांची प्रेमाची गाठ

परतून फक्त आठवणी येतात
माणसे मात्र येत नाही
त्यांच्या जाण्या अगोदर करून देऊ मोकळी मनातल्या सच्चा भावनांना वाट

*सुजाता नवनाथ पुरी*
अहमदनगर..
8421426337

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 18 =