You are currently viewing काळवेळ!चेहरे लक्षांत ठेवते!

काळवेळ!चेहरे लक्षांत ठेवते!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*काळवेळ!चेहरे लक्षांत ठेवते!*

पैसे नसतांना!एक वेगळी किंमत
पैसे असतांना!एक आगळी किंमत
माणूस म्हणून जगण्याची या हिशोबी दुनियादारीत ! माणूसकीची गंमत..!

कदर,प्रतिष्ठा,दाणागोटा,नाती
खिशात डोकावून बघत असते
जवळचे सोबती साथ सोडतात
तेव्हा कोठे!माणूसकी नीट कळते..!

वेगवेगळ्या चेह-यांची आपलीच माणसं
पाठीवरच पाठीमागे कडवट हसतांत
आरश्यांच्या मयसभेत अशीही वेळ येते
ती काळवेळ!सर्वांचे चेहरे लक्षांत ठेवतांत…ती वेळ!!ते हसणारे चेहरे आठवणीत ठेवते!लक्षांत ठेवते!!

दुस-याच्या परिस्थितीवर हसणारे
ह्दयावर चर्रे ओढत राहतात
हातातील मांजाने स्वतःलाच जखमा
करत…
आपल्याच घराला आग लावून घेतात.!

कदाचित तुम्ही विसरालही…
पण ती वेळ ते चेहरे विसरत नाही.!!
अपमान,दुःख,वेदना ती लक्षांत ठेवते
तुम्ही विसरालही:तो काळ !ती वेळ विसरत नाही …..!!!!

बाबा ठाकूर

 

*संवाद मिडिया*

*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*

*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*

*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*

*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*

*🌐Advt Web link*

———————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा