You are currently viewing सांगु कशी ईश्य गडे

सांगु कशी ईश्य गडे

.भारतीय साहित्य व सांस्कृतीक मंच कोल्हापूर चे सदस्य उत्तम आवचार यांची अप्रतिम काव्यरचना

निलकाव्य

सांगायचे होते तुला
सांगु कशी प्रिया
ओठांत आलेले शब्द
तुझ्या आठवणीत झुरते राया.

लाज बावरी मनात
आजुन लाजरी
जळते मनात मीच
भावना ओथंबून येतात उरी.

वाटेवर माझे डोळे
तुझ्याच येण्याच्या
येणार तु ईथे
निरोप येई मला हाती वाऱ्याच्या.

ओथंबलेल्या भावना
मनात दडल्या
बाहेर कशा रे काढू
बहरलेल्या हिरव्या सुगीतल्या.

भेटून तुजला धरी
चांदण्यांची पात
मंजुळ वाऱ्याच्या रात्री
मलाच खुनवते दिव्याची वात

सांगु कशी ईश्य गडे
धडकी भरते
मन मोकळं करुनी
दिव्याची ज्योत होऊन मी जळते.

उत्तम आवचार परळी
खेर्डेकर (भाऊसाहेब)

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + fifteen =