You are currently viewing मन तुझ्यात गुंतले

मन तुझ्यात गुंतले

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या कवयित्री सौ आदिती मसुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मन तुझ्यात गुंतले*

 

*काव्य प्रकार – अष्टाक्षरी*

 

 

मन तुझ्यात गुंतले

स्वप्न रंगी मोहरले

कल्पनांच्या झुल्यावर

एकटेच पहुडले

 

हृदयाच्या तिजोरीत

प्रेमरत्न साठविले

अनमोल खजिन्यास

जीवापाड सांभाळीले

 

आठवांची प्रीत फुले

साठविली ओंजळीत

शब्दगंध प्रीतीतला

करी मजला मोहित

 

पापण्यांच्या पंखुडीने

उधळीला प्रीतगंध

दैवयोगे बांधीयला

अलौकिक प्रेमबंध

 

तुझ्या सहवासातील

आनंदाचा एक क्षण

देतो उभारी मजला

होते उल्हासित मन

 

नभातील चांदवाही

उगा चिडवी मजला

तुटणारा एक तारा

धाडी निरोप तुजला

 

मनातला मोर आज

तुला पाहुनी हसला

गुंतलेला जीव माझा

तुझ्या मीठीत फसला

 

*✒️© सौ. आदिती धोंडी मसुरकर*

*कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*पिन -४१६५२०*

प्रतिक्रिया व्यक्त करा