You are currently viewing ४८ खेड्यांचे आराध्य दैवत असलेल्या डेगवे गावच्या श्री स्थापेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव ७ फेब्रुवारी रोजी

४८ खेड्यांचे आराध्य दैवत असलेल्या डेगवे गावच्या श्री स्थापेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव ७ फेब्रुवारी रोजी

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावातील नवसाला पावणाऱ्या व हाकेला धावणाऱ्या,४८ खेड्यांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “श्री स्थापेश्वर,महालक्ष्मीचा वार्षिक जत्रोत्सव” सोमवार दि. ७ फेब्रुवारी २०२२ रोजी आहे.
सदर जत्रोत्सवात सकाळी धार्मिक कार्यक्रम, दुधाभिषेक, मानकरी, देवस्थान समितीचे पदाधिकारी,गावरहाटीचे विविध धार्मिक कार्यक्रम ,सकाळी ब्राह्मणांच्या हस्ते, गावगाराणे, देवतांची पालखी मंदिरात आणणे.त्यानंतर नवस करणे, फेडणे, ओटी भरणे नारळ, केळी,साखर ठेवणे असे विविध कार्यक्रम दिवसभर आयोजित केले आहेत.

त्यानंतर रात्री भजन, महाआरती,व मंदिरा भोवती पालखी काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री “चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे” “वज्र शल्क” हा नाट्य प्रयोग आयोजित केला आहे.त्याचा नाट्य रशिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन केले आहे.
या जत्रोत्सवाला मुंबई,पुणे,रत्नागिरी,बेळगाव,कर्नाटक,गोवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून देवतांचे दर्शन घेत असतात.
यावेळी मंदिर जिर्णोध्दारा करीता प्रतिवर्षी प्रकाशित करण्यात येणाऱ्या “श्री स्थापेश्वर,महालक्ष्मी दिनदर्शिका २०२२” चे वितरण करण्यात येणार आहे.


तरी सर्व भाविकानी करोनाचे नियम व मास्क वापरून दर्शन घ्यावे. अशी विनंती गावरहाटी, देवस्थान समिती, व मानकरी, यांनी केली आहे.
तरी सर्व ग्रामस्थांनी,भाविकानी जत्रोत्सवा करीता हजर राहून सहकार्य करावे हि विनंती आहे.

उल्हास देसाई,
सरचिटणीस,डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + eight =