You are currently viewing २८ जुन रोजी वेंगुर्ले हायस्कूलच्या नूतन वर्गखोल्यांचे उद्घाटन

२८ जुन रोजी वेंगुर्ले हायस्कूलच्या नूतन वर्गखोल्यांचे उद्घाटन

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ले हायस्कूल माजी विद्यार्थी संघातर्फे केलेल्या आर्थिक सहाय्यातून वेंगुर्ले हायस्कूलच्या पाच वर्ग खोल्यांची बांधणी करण्यात आली आहे. त्याचा उद्घाटन सोहळा २८ जुन रोजी आयोजित केला आहे. वेंगुर्ले हायस्कूलच्या सर्वांगीण विकासासाठी वेंगुर्ले हायस्कूल माजी विद्यार्थी संघ कार्यरत आहे. या संघातर्फे हायस्कूलच्या पाच वर्ग खोल्यांचा बांधणीसाठी टप्प्या टप्प्याने आर्थिक सहाय्य केले होते. यातून वर्गखोल्यांच्या बांधणीचे काम पूर्णत्वास आले आहे. या नवीन वर्ग खोल्यांचा उद्घाटन समारंभ २८ जुन रोजी सकाळी ११ वाजता साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा