You are currently viewing कळसुली ग्रामपंचायतीत सौ. शुभदा सीताराम देसाई यांचा सदस्य पदासाठी अर्ज दाखल

कळसुली ग्रामपंचायतीत सौ. शुभदा सीताराम देसाई यांचा सदस्य पदासाठी अर्ज दाखल

कणकवली :

 

कळसुली ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदासाठी सौ. शुभदा सीताराम देसाई यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग २ मधून सदस्य पदासाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

कॉमर्स मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या सौ. शुभदा सीताराम देसाई या डबल ग्रॅज्युएट असून बी एड ची पदवीही मिळवली आहे. तसेच कार्यक्षम शिक्षका होत्या. त्यांचा जनसंपर्कही मोठा आहे.

भाजपच्या क्रियाशील कार्यकर्त्या म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. महिला मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमातही त्यांचा मोलाचा सहभाग असतो.

भाजपचा सुपरिचित आणि आश्वासक चेहरा म्हणून शुभदा देसाई यांना पसंती आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सौ. देसाई यांना संधी मिळाली आहे. सर्वसामान्यांना आपल्याशा वाटणाऱ्या या नव्या चेहऱ्याला मतदारांकडून पसंती मिळण्याची शक्यता आहे. आपण समाजाचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या समस्यां मार्गी लावण्यासाठी या निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे सांगत मतदार आपल्यावर नक्की विश्वास दाखवतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + thirteen =