You are currently viewing युवराज लखमराजेंचा वाढदिवस उत्साहात साजरा…

युवराज लखमराजेंचा वाढदिवस उत्साहात साजरा…

सावंतवाडी

येथील संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांचा वाढदिवस आज अनेक चाहत्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या राजकीय व सामाजिक प्रवासाला भविष्यात यश मिळो, अशा शुभेच्छा त्यांना उपस्थितांकडून देण्यात आल्या.

यावेळी राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, अँड. नकुल पार्सेकर, एल.एम. सावंत, प्राचार्य डॉ. डी.एल.भारमल, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य, श्री पंचम खेमराज महाविद्यालय, पंचम खेमराज विधी महाविद्यालय, मदर क्विन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, ह. हा. राजमाता सत्वशीला देवी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा