You are currently viewing कुहुकुहु

कुहुकुहु

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी यांची काव्यरचना

चल राणी दोघे फिरु
मकरंद मस्त खाऊ
कुहुकुहु नादासवे
वनी रंगुनिया जाऊ

दाट दाट गर्द झाडी
पान फुल येथे शोधू
रंग रुप पाहुनिया
कुहुकुहु असे वधू

मोरपंखी तो पिसारा
नाच गाणे संगे गाऊ
साद देऊ एकमेका
कुहुकुहु बोल भाऊ

किलबिल पक्षी गुंज
भाषा थोडी त्यांची शिकू
घरट्यात त्यांच्यासवे
मकरंद गोड चाखू

चैत्र पालवी नव्हाळी
फुल फुल देई हाळी
गीत त्यांचे गात गात
ताल सुर देऊ टाळी

गुलमोहरचा भार
लाल लाल रंग पेलू
तप्त ऊन्हातही सारे
हसतच दुःख झेलू

जुने सारे विसरुनी
नव निर्मितीच शोध
हसतच जगण्याचा
चल घेऊ आज बोध

रांग बगळ्याच्या संगे
चिऊ काऊ मैना पाहू
अंगभर पंख लेहू
संचारत दोघे जाऊ

बोरबाभळ झाड
झुके विहिरीत खोल
पाखराची करामत
खोपा मध्ये ऐकू बोल

कुहुकुहु नाद घुमे
मोरपंखी नाच फुले
छोट्या छोट्या गवतात
पाखरांची झुले मुले

© मुबारक उमराणी
राजर्षी शाहू काॅलनी
शामरावनगर, सांगली
मो.९७६६०८१०९७.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − eight =