You are currently viewing श्याम निळाई

श्याम निळाई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री पुष्पा सदाकाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*श्याम निळाई*

 

 

*उभी निळाई नितळ*

*तिचा निळा निळा साज*

*नील जादुई नवलाई*

*कवेत निलांबरीच्या आज*

 

*मिटल्या नयन तळी*

*लोभसवानी शाम निळाई*

*कृष्ण धवल त्या रंगात*

*केवढी वाटते अपूर्वाई*

 

*दोन बाहुल्या डोळ्यांच्या*

*किती नाजूक बारीक*

*चितारिता सुंदर नक्षी*

*मना केवढा हारिक*

 

*श्याम निळाई खुलते*

*प्रीतगंधी सचैल नाहते*

*एकअनामिक ओढ मना*

*सुध बुद्ध पुरती हरते*

 

*यौवनाच्या फुलवारीला*

*गंध कस्तुरीचा सुवास*

*सजवून माझेच आकाश*

*काव्य रचिते झकास*

 

*मोरपिसाची निळाई*

*अन् बासुरीची मधुरधून*

*रंगते प्रीत प्रणयाची*

…. *निळ्याशार डोही डुंबून*……

 

 

*पुष्पा सदाकाळ भोसरी पुणे*..

*९०११६५९७४७*

प्रतिक्रिया व्यक्त करा