You are currently viewing श्री देवी भगवती त्रिपुरसुंदरी होत

श्री देवी भगवती त्रिपुरसुंदरी होत

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

त्रिपुरी पौणिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

श्री देवी भगवती त्रिपुरसुंदरी होत
शिवशक्ती विश्वाचे जनक जानकी होत।।ध्रु।।

देवी भगवती आहे कुंडलिनी रूप
भगवती त्रिपुर सुंदरी मातृरुप
हरिहर ब्रह्मदेवादी तव स्तुती गात।।1।।

श्री विद्येचे अनुष्ठान प्रगटे रितीनं
राहे फिरत तनूतील षडचक्रांतून
बहिर्मुख मूर्तीपूजा अंतर्मुखे ध्यात।।2।।

तव चरण कमलाचा सूक्ष्म रज:कण
ब्रह्मा निर्मितो त्याने चतुर्दश भुवन
हरिहर प्रयासे शिरावर तो पेलत।।3।।

श्री अरुण गांगल.कर्जत,रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + eighteen =