You are currently viewing कोरोना विषाणूचा मानवी मेंदूवरही हल्ला…

कोरोना विषाणूचा मानवी मेंदूवरही हल्ला…

 

 

कोरोना विषाणूच्या संसर्गाची सुका खोकला, गळ्यामध्ये सूज, थकवा, तीव्र ताप आणि श्वास घेण्यास होणारा त्रास ही प्रमुख लक्षणे आहेत. परंतु हल्ली या रुग्णांमध्ये गोंधळ, वास न येणे, वर्तनातील बदल अशी काही न्यूरोलॉजिकल लक्षणेही दिसत आहेत. तर ज्या रूग्णांना कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला आहे त्या रुग्णांच्या मानसिक स्थितीवरही विपरित परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

 

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचे एमडी रॉबर्ट स्टिव्हन यांचे असे सांगणे आहे की, कोविड-१९ च्या युनिटमधील सुमारे अर्ध्या रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल लक्षणे आढळून आली आहेत. आता कोरोना विषाणूच्या मेंदूवर विपरित परिणाम का दिसून येत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये आता स्ट्रोक, ब्रेन हॅमरेज आणि मेमरी लॉससारखे काही परिणाम दिसून येऊ लागले आहेत.

 

रॉबर्ट स्टीव्हन्स यांच्या जॉन्स हॉपकिन्समध्ये प्रसिद्ध झालेल्या या लेखानुसार संपूर्ण जगामध्ये कोविड-१९ च्या आजारामध्ये मेंदूशी संबंधित सर्व लक्षणे दिसून येऊ शकतात. यामध्ये गोंधळ उडणे, बेशुद्ध होणे, स्ट्रोक, चव आणि वास घेता न येणे, डोकेदुखी, मन एकाग्र न होणे आणि वर्तनामधील बदल अशा अडचणी दिसून येऊ शकतात.

 

त्यांच्या संशोधनानुसार जर विषाणू डोक्यात प्रवेश करण्यास सक्षम असेल तर गंभीर आणि अचानक संसर्गाचा धोका खूप वाढू शकतो. चीन आणि जपानमध्ये असे काही रुग्ण आढळून आले आहेत. ज्यांच्यामध्ये विषाणूचा जेनेटिक मटेरियल स्पायनल फ्लडमध्ये दिसून आला होता. तर फ्लोरिडामध्येही असा एक रुग्ण दिसून आला होता. ज्याच्या मेंदूमधील पेशींमध्ये विषाणूचे अवशेष सापडले होते. असे केवळ रक्तवाहिन्या आणि तंत्रिकांमध्ये विषाणूने प्रवेश केल्यानंतरच होऊ शकते.

 

कोरोना विषाणूशी लढण्याने शरीरातील इम्युन सिस्टिमवरही परिणाम होतो. इनफ्लेमेटरी रिस्पॉन्सदरम्यान, मलाडेप्टिव्ह तयार झाल्यामुळे आजारपणामध्ये शरीरातील उती आणि इतर अवयवांचे नुकसान होते.

 

कोविड-१९ चा संसर्ग झाल्यानंतर व्यक्तीमध्ये अनेक प्रकारचे मानसिक बदल दिसून येतात. तीव्र तापापासून शरीराच्या विविध भागात ऑक्सिजनची कमतरता ब्रेन डिस्फंक्शनचे कारण ठरते. कोविड-१९ च्या अनेक प्रकरणांमध्ये रुग्णाची शुद्ध हरपणे तसेच तो कोमामध्ये जाण्याची भीतीही दिसून येते.

 

कोविड-१९ च्या आजारामध्ये शरीरात ब्लड क्लॉटिंग सिस्टिमची समस्या दिसून येऊ शकते. ब्लड क्लॉटस व्यक्तीच्या फुप्फुसे आणि शरीरामधील अंतर्गत नसांमध्ये दिसून येऊन, त्यामुळे रक्तप्रवाह बंद होऊ शकतो. जर ब्लड क्लॉटने मेंदूपर्यंत जाणाऱ्या धमन्यांचा रस्ता बंद केला, तर स्टोकची समस्या निर्माण होऊ शकते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =