You are currently viewing प्यारा तिरंगा

प्यारा तिरंगा

*प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कवी दीपक पटेकर यांनी भारत भूमीच्या वीरांच्या बलिदानावर लिहिलेले देशभक्तीपर गीत*

*शीर्षक: प्यारा तिरंगा*

डौलाने फडकतो माझा
आसमंती तिरंगा प्यारा !!धृ!!

बलिदान दिले हजारोंनी
झाला शहिद प्राण अर्पूनी
भारतभूचा पुत्र हा न्यारा
आसमंती तिरंगा प्यारा !!१!!

जात धर्म ना पंथ पाहिले
भारतभूसाठी प्राण वाहिले
उखळला तो लाडका तारा
आसमंती तिरंगा प्यारा !!२!!

डोंगरदरी बर्फात लढले
संघर्षात दिवस काढले
सोसला शून्य डिग्री पारा
आसमंती तिरंगा प्यारा !!३!!

वाट पाहुनी सुकले डोळे
आई बाप घरी देवभोळे
धीर धरती छातीशी सारा
आसमंती तिरंगा प्यारा !!४!!

लपेटून तिरंग्यात येतो
उर गर्वाने फुलून जातो
अश्रूंना आटवितो वारा
आसमंती तिरंगा प्यारा !!५!!

©[दिपी]🖊️
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग, ८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा