*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम कविता*
*।। आरती गजाननाची ।।*
——————————————–
आलो आज या दरबारी
प्रार्थना करी अंतरीची
करू आरती गजाननाची ।।
आधार तुमचा आहे
मन हे शांत शांत आहे
मना गरज उपदेशाची
करू आरती गजाननाची ।।
घडो सेवा नित्य भक्ती
नको मनात ती आसक्ती
करू विनवणी स्वामींची
करू आरती गजाननाची ।।
सद्गुण मनी रुजवावे
संस्कार मनावर व्हावे
याचना ही अरुणदास”ची
करू आरती गजाननाची ।।
————————————————–
कविता – ।।आरती गजाननाची ।।
कवी-अरुणदास “अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
———————————————————————–
