You are currently viewing संत तुकाराम

संत तुकाराम

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्र वेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांनी तुकाराम बिज निमित्ताने लिहिलेली अभंग रचना

इंद्रायणी काठी ! पुण्यभूमी देहू !
लिन आम्ही होऊ ! विठ्ठलाशी !!१!!

बोल्होबा आणिक ! कनकाई पोटी !
जन्म जगज्येठी ! तुकोबांचा !!२!!

सोज्वळ पताका ! घेऊनिया हाती !
दावीयली भक्ती ! विठोबाची !!३!!

रोम रोमामध्ये ! पांडुरंग ध्यानी !
पांडुरंग मनी ! जागरथी !!४!!

वृक्ष वेलींवर ! प्रेम अतोनात !
दंग भजनात ! विठ्ठलाच्या !!५!!

संत नामदेव ! दुजा अवतार !
भक्तीचे संस्कार ! बोल्होबाचे !!६!!

सावकारी पाश ! केला कर्ज मुक्त !
संत एक फक्त ! तुकाराम !!७!!

अंधश्रद्धा दूर ! केली प्रबोधने !
ईश्वर भक्तीने ! सुखमार्ग !!८!!

अभंगाची गाथा ! ज्ञानाचा हा स्रोत !
कायम मुखात ! असावाच !!९!!

©【दिपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा