You are currently viewing राष्ट्रवादी कणकवली पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

राष्ट्रवादी कणकवली पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

सिंधुदुर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कणकवली तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी आज जाहीर केल्या.
जिल्हा उपाध्यक्षपदी कणकवलीचे अविनाश गौतम चव्हाण, कणकवली शहर युवक अध्यक्षपदी संदेश मयेकर, कणकवली ग्रामीण युवक अध्यक्षपदी नयन नारायण गावडे (वागदे) यांचा समावेश आहे. कणकवली तालुक्यात तरुण कार्यकर्त्यांची मोट बांधून भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी व आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची व्युहरचना आखण्याची रणनीती जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कणकवली तालुक्यात होत आहे. अन्य पदाधिकारी यांच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + nine =