अवकाळी पावसामुळे फुकेरी येथील राधाबाई कृष्णा आईर यांच्या घराची मागची पडवी कोसळली…

अवकाळी पावसामुळे फुकेरी येथील राधाबाई कृष्णा आईर यांच्या घराची मागची पडवी कोसळली…

२० हजार रुपयांची झाली नुकसानी झाली

दोडामार्ग
गुरुवारी (दि. ७ जानेवारी ) झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळीवारे आले त्यात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास फुकेरी येथील राधाबाई कृष्णा आईर यांच्या घराची मागची पडवी कोसळली मंगलोरी कौले, लाकडी रिप, वासे यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास २० हाजारांचे नुकसान झाले आहे.
याची माहिती संबंधित तलाठी यांना राधाबाई कृष्णा आईर यांनी दिली असता तलाठी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला आहे. तरी नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी राधाबाई कृष्णा आईर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा