You are currently viewing कुडाळ नगरपंचायतच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे  आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

कुडाळ नगरपंचायतच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

*पुरुषांसाठी ३० तर महिलांसाठी २५  बेडची व्यवस्था*

कुडाळ :

कुडाळ नगरपंचायतच्या वतीने शहरातील संत राऊळ महाराज महाविद्यालय आणि महिला वसतीगृह येथे संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या  विलगीकरण कक्षाचे उदघाटन करण्यात आले. याठीकाणच्या सोयी सुविधांची आ.वैभव नाईक यांनी पाहणी करून आवश्यक सूचना केल्या.

कुडाळ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी वसतीगृह येथे महिलांसाठी २५ बेड तर संत राऊळ महाराज कॉलेज येथे पुरुषांसाठी ३० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

यावेळी कुडाळ नगर पंचायतचे मुख्याधिकारी नितीन गाढवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,  शहरप्रमुख संतोष शिरसाट,  सचिन काळप, अतुल बंगे, संजय भोगटे, राजू गवंडे, रुपेश पावसकर, साईश घुर्ये, नगरपंचायतचे संदीप कोरगावकर, कुडाळ हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. जामसंडेकर सर, संस्था पदाधिकारी अरविंद शिरसाट, आनंद वैद्य, आरोग्य कर्मचारी दीपक तिवरेकर, सतीश कुडाळकर, संतोष कुडाळकर, सागर कुंभार, श्रीम. कुडाळकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा