You are currently viewing मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे दोन कार मधे  अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे दोन कार मधे  अपघात

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावर कणकवली ओसरगाव डंगळवाडी दरम्यान असरोंडी फाटा नजीक दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास दोन कार एकमेकांना धडकून अपघात झाला. यात दोघे जखमी झाले आहेत.
अपघातात दोन्ही कार ने एकमेकांना धडक दिल्याने एक कार रस्ता सोडून खाली उतरली.

या अपघातात दोघांना दुखापत झाली असून दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गावर वागदे येथील असगणी फाटा ते ताठरबाव फाटा या असरोंडी फाट्यावरून महामार्गावर कार येत असताना कुडाळ वरून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या कारला धडक बसल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. यावेळी तातडीने महामार्ग पोलीस दाखल होत आहे. वाहतूक सुरळीत केली असून दुखापत झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा