You are currently viewing मुंबईत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आंबा महोत्सवचे उद्घाटन

मुंबईत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आंबा महोत्सवचे उद्घाटन

मुंबई :

 

कोकण भूमी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने सिंधदुर्ग भवन येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते, आंबा महोत्सव 2023 चे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे निलेश राणे आयोजक आहेत. मुंबईत अंधेरी येथे 1 एप्रिल ते 31 मे म्हणजे संपूर्ण दोन महिने कोकणातील शेतकऱ्यांच्या हापूस आंब्याची विक्री या शेतकरी आंबा बाजार मध्ये केली जाईल. आमदार प्रसाद लाड यांच्या पुढाकाराने संपूर्ण मुंबईत 15 ठिकाणी शेतकरी आंबा बाजार आयोजित केला आहे. यावेळी समृद्ध कोकण आंबा बागायतदार संघटनेचे प्रमुख प्रकाश साळवी आणि प्रदीप सावंत यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्योजकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य आणि मदत करण्याचे आश्वासन दिले.

आंबा महोत्सवात निलमताई राणे, माजी खासदार निलेश राणे, संयोजक संजय यादवराव आदी मान्यवर उपस्थित होते. या आंबा महोत्सवाच राणे यांनी कौतुक केलं. निलेश राणे यांनी चांगला उपक्रम राबवला आहे. गेली अनेक वर्ष मी कोकणाला प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न केला. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यांच्या तुलनेत कोकण प्रगत झालाय. आजचा विषय आंब्याच्या ब्रँडीगचा आहे. आजकाल कृषी विद्यापीठ आहेत. मात्र आंबा कसा पिकवावा, बायप्रॉडक्ट कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जात नाही, असं राणे म्हणाले.

मी अमूल प्रॉडक्शन बघितले. 30 लिटरच्या दुधाचे चीज, बटर करुन 150 रुपये कमवते. मात्र आंबा आपण तसा आहे तसा विकतो. त्याचे व्हॅल्यू अॅडेड प्रॉडक्ट करत नाही. कोकणी माणसाने बायप्रॉडक्टचे ज्ञान कधी घेतले नाही. हे शिका ना.. कर्ज कर्ज कधीपर्यंत बोलणार? चीनमधे एक मशीन एक लाख बॉटल बनवते. मात्र आपल्याकडे पाच हजार पेक्षा जास्त बॉटल एका दिवसात निघेल. कर्ज हा प्रश्न एका दिवसात सुटेल. मात्र कायम स्वरुपी मार्ग हवा, असंही त्यांनी सांगितलं.

मी 1995 मध्ये मासे पकडायला एक ट्रॉलर घेतला होता. खलाशी काळोख पडत गेला की भाव कमी करत आणतो. मुंबईत दोन हजाराला पापलेट मिळतो. मात्र जाग्यावर 200 रुपयाला जातो. आपण साडे सात वाजली की काम बंद करतो. कारण आपल्याला दुसरी कामं असतात. हे सर्व बंद करु शांततेने विचार केला पाहिजे. जपानमध्ये 750 ग्रॅम आंब्याची किंमत 1 लाख 30 हजार आहे. माझ्याकडे या. मी सर्व मदत करतो. एकदाच चांगला मार्ग काढू. सर्व मदत करतो. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटतो. एक पॅकेज जाहीर करायला लावतो, असंही त्यांनी सांगितलं.

सध्या अरोरा टॉकीज महेश्वरी उद्यान माटुंगा, श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, चंदावरकर लेन बोरिवली पश्चिम, सिंधुदुर्ग भवन वर्सोवा अंधेरी या तीन ठिकाणी दोन महिने शेतकरी आंबा बाजार चालू राहणार आहे. कोकणातील विशेषत: देवगड व रत्नागिरीतील हापूस आंबे मुंबईकरांना आंबा बाजारामध्ये उपलब्ध होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा