You are currently viewing राणीची बाग भायखळा येथे वाघाच्या बछड्याचे “वीरा ” तर हम्बोल्ट पेग्विनच्या पिलाचे “आँस्कर” असे नामकरण

राणीची बाग भायखळा येथे वाघाच्या बछड्याचे “वीरा ” तर हम्बोल्ट पेग्विनच्या पिलाचे “आँस्कर” असे नामकरण

मुंबईतील भायखळा येथील राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात जन्मलेल्या पेंग्विनच्या दोन पिल्लांची आणि वाघाच्या बछड्याचं अखेर ‘बारसं’ झालं. या पेंग्विनच्या पिल्लांची नावं काय असतील याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. आता या ऑस्कर आणि ओरिओ अशी नावं त्यांना देण्यात आली आहे. तर करिष्मा आणि शक्ती या वाघांच्या जोडीनं जन्म दिलेल्या मादी जातीच्या बछड्याचं नाव वीरा ठेवण्यात आलं आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात हम्बोल्ट पेंग्विनची जोडी डोनाल्ड आणि डेझी यांनी एका पिलाला जन्म दिला होता. त्याचे नाव ओरियो ठेवण्यात आले आहे. तर मॉल्ट आणि क्लिपर या पेंग्विनच्या जोडीनं जन्म दिलेल्या पिलाचं नाव ऑस्कर ठेवण्यात आलं आहे.

औरंगाबाद येथून २०२० मध्ये करिष्मा आणि शक्ती ही जोडी भायखळा येथील राणीच्या बागेत आणण्यात आली होती. या जोडीने १४ नोव्हेंबर २०२१ रोजी एका बछड्याला जन्म दिला होता. यातील मादी जातीच्या बछड्याचं नाव वीरा ठेवण्यात आलं आहे. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी या बछड्याचं नाव निश्चित केलं आहे.

 

राणीच्या बागेत ऑगस्ट २०२१ मध्ये नवीन पाहुण्याचं आगमन झालं होतं. या उद्यानातील हम्बोल्ट पेंग्विननं पिलाला जन्म दिला होता. विशेष म्हणजे भारतात प्रथमच पेंग्विनचा जन्म झाला आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात अर्थात राणीच्या बागेत जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लांचे आणि वाघाच्या बछड्याचे नामकरण करण्यात आले. महापौर किशोरी पेडणेकर यांनी नामकरण सोहळ्यानिमित्त केक कापला. या पेंग्विनच्या पिल्लांची आणि बछड्याचे नामकरण करण्यात आले. या निमित्त उद्यानात आकर्षक रोषणाईही करण्यात आली होती. पेंग्विनच्या पिल्लांची नावं ऑस्कर आणि ओरिओ अशी ठेवण्यात आली, तर मादी बछड्याचे नाव वीरा ठेवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 15 =