You are currently viewing मनविसे अध्यक्षांच्या आदेशानुसार कणकवलीत मनसे विद्यार्थी सेना युनिट ची स्थापना व फलकाचे अनावरण

मनविसे अध्यक्षांच्या आदेशानुसार कणकवलीत मनसे विद्यार्थी सेना युनिट ची स्थापना व फलकाचे अनावरण

कणकवली

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष मा.अमित राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच जिल्हाध्यक्ष निलेश मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली काल  एस एम ज्युनिअर कॉलेज कणकवली येथे उत्तर सिंधुदुर्गातील दुसऱ्या मनसे विद्यार्थी सेना युनिट्सची स्थापना आणि फलक अनावरण रत्नागिरी सिंधुदुर्ग संपर्क अध्यक्ष श्री अमोल साळुंके यांच्या उपस्थतीत करण्यात आले.  यावेळी कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. व जल्लोषात युनिट ची स्थापना कॉलेज विद्यार्थ्यांच्या उपस्थिती करण्यात आले.

यावेळी युनिट अध्यक्ष म्हणून सुजल कदम यांची नेमणूक करण्यात आली व कॉलेज युनिटचे इतर पदाधिकारी ही नेमण्यात आले.  यावेळी शहराध्यक्ष धनंजय गोरे व मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 11 =