You are currently viewing कोकणच्या विकासाचे स्वप्न साकार करूया..!

कोकणच्या विकासाचे स्वप्न साकार करूया..!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे फोंडाघाट येथील सत्कार प्रसंगी प्रतिपादन

फोंडाघाट

फोंडाघाट हा आपला बालेकिल्ला असल्याने मला येथील जनतेने मनापासून साथ दिली आहे, तशीच साथ यापुढेही मोदीसाहेबांच्यावर असू द्या. आपले विकासाचे स्वप्न साकार करू या. आज उशीर झाल्याने वेळेअभावी झालेली कसर मी पुढील वेळी येईन, तेव्हा पूर्ण करेन.. अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी फोंडाघाट येथील सत्कार स्वीकारल्यावर दिली.रात्री दहा वीस वाजता दादांचे व्यासपीठावर आगमन होताच, उपस्थित हजारो भा.ज.पा.कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. उशीर झाल्याने केवळ सत्कार आणि निवेदन स्वीकारून ते कणकवलीकडे मार्गस्थ झाले.

यावेळी दशक्रोशीतील पदाधिकारी व ग्रामस्थांच्यावतीने त्या- त्या गावचे सरपंच यांनी, पंचक्रोशीतील बचत गटातर्फे बचत गट प्रमुख, भा.ज.पा. युवा मोर्चा, वैश्य समाज बँक, चर्मकार समाज, राधाकृष्ण मंदिर, स्वयंभू देवस्थान पियाळी, नवदुर्गा मंडळ कुर्ली, राहुल देसाई- कोल्हापूर यांनी पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आणि शुभेच्छा दिल्या. तसेच फोंडाघाट गांव इकोसेन्सिटिव्ह झोन मधून त्वरित वगळावा, फोंडाघाट गावात मिनी एम.आय.डी.सी. व्हावी, मठखुर्द येथे रिक्षा व रेल्वेला थांबा मिळावा म्हणून त्रिमूर्ती रिक्षा मंडळातर्फे निवेदने देण्यात आली.

यावेळी राजन चिके, मनोज रावराणे, बबन हळदीवे, तुळशीदास रावराणे ,सुजाता हळदीवे,भालचंद्र राणे, छोटू राणे, संतोष राणे, अजय रावराणे, अण्णा तेंडुलकर, विश्वनाथ जाधव, सुरेश सामंत, भाई भालेकर, सिद्धेश पावसकर ,गजानन सावंत, नरेश गुरव आणि भाजपा व स्वाभिमानचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. निसर्ग- पाऊस आणि लाईटचा लपंडाव इत्यादी अनेक संकटांना तोंड देत दादांचा सत्कार समारंभ व शिस्तबद्ध आणि लक्षणीय ठरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा