You are currently viewing या 4 खेळाडूंची कारकीर्द विराट कोहलीच्या कर्णधारपदा सोबत संपणार?

या 4 खेळाडूंची कारकीर्द विराट कोहलीच्या कर्णधारपदा सोबत संपणार?

विराट कोहली नेहमीच त्याच्या आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहे आणि तो खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठीही ओळखला जातो. विराट कोहलीनं कसोटी कर्णधारपद सोडलं आहे. त्यानंतर चाहते देखील हैराण झाले आहेत. त्याच्या कर्णधारपदाखाली अनेक खेळाडूंनी संघात आपले कायमस्वरूपी स्थान निर्माण केले होते.

विराट कोहलीनं कर्णधारपद सोडल्यानंतर आता 4 क्रिकेटपटूंचा काय होणार असा प्रश्न पडला आहे. कोहलीमुळे हे खेळाडू संघात आपलं स्थान अधिक बळकट करू शकले. आता नवा कर्णधार आल्यानंतर या खेळाडूंना आता काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या काही दिवसांत अजिंक्य रहाणे खराब फॉर्ममधून जात आहे. पण विराट कोहलीसोबत अजिंक्य रहाणेनं अनेक सामन्याच चांगली कामगिरी केली आहे. रहाणे अत्यंत वाईट फॉर्ममधून जात असतानाही कोहलीनं त्याची साथ सोडली नाही. कोहलीने त्याला संघात कायम ठेवले. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत तो टीम इंडियाचा कर्णधार राहिला होता.

 

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली संघाने ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली. पण गेल्या काही दिवसातील रहाणेची कामगिरी पाहता आता त्याला पुन्हा अशा परिस्थितीत टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार त्याच्या जागी श्रेयस अय्यर किंवा हनुमा विहारीला संधी देऊ शकतो.

चेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म त्याच्या करिअरसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या 2 वर्षात त्याला एकही शतक झळकवण्यात यश आलं नाही. टीम इंडियाचा नवा कर्णधार कदाचित त्याला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. कोहलीनं पुजाराला खूप जास्त सपोर्ट केलं होतं. आता पुजाराचं काय होणार हे पाहावं लागणार आहे. जागी युवा खेळाडू सूर्यकुमार यादवचा समावेश केला जाऊ शकतो.

अक्षर पटेलने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. जडेजा किंवा शार्दुल ठाकूर यांच्या जागी नवा कसोटी कर्णधार संघात सामील होऊ शकतो. अक्षर पटेल आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो.

इशांत शर्मा हा संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. इशांतने 100 हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. पण कोहलीच्या नेतृत्वाखाली त्याला अधिक यश मिळाले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आता नवा कर्णधार आल्यानंतर काय होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 13 =