कणकवली तालुक्यातील कंटेन्मेंट झोन
कणकवली तालुक्यातील कंटेन्मेंट झोन

कणकवली तालुक्यातील कंटेन्मेंट झोन

>कणकवली तालुक्यातील कलमठ-गोसावीवाडी येथे कंटेन्मेंट झोन

कणकवली तालुक्यातील कलमठ-गोसावीवाडी येथील मिलींद पाटील हे रहात असलेले घर व (50 मीटर) (Location16.2664N 73.7039)चा परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

>कणकवली तालुक्यातील कासार्डे- आनंदनगर येथे कंटेन्मेंट झोन

कणकवली तालुक्यातील आनंदनगर येथील इंद्रजित पंढरीनाथ महाडीक (महाडीक कॉम्पलेक्स) हे राहात असलेले घर (Location16.4403N 73.6676)चा परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवलीच्या उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा