You are currently viewing आम. वैभव नाईक यांनी माणगाव ग्रामपंचायतीमध्ये दिली भेट

आम. वैभव नाईक यांनी माणगाव ग्रामपंचायतीमध्ये दिली भेट

कुडाळ :

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज माणगाव ग्रामपंचायत येथे भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. आ. वैभव नाईक यांनी ग्रा.पं. च्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच विकास कामांचा देखील आढावा घेत सरपंच, उपसरपंच यांना मार्गदर्शन केले.

यावेळी माणगाव सरपंच मनीषा भोसले, उपसरपंच बापू बागवे, शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, रमाकांत ताम्हणेकर, बंड्या कुडतरकर,कौशल जोशी, दीपक आंगणे, संदीप सावंत,स्वप्नील शिंदे, अवधूत गायचोर, बंटी भिसे, एकनाथ धुरी, बच्चू नाईकआदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा