You are currently viewing कणकवली तालुक्यात 48 कोरोना रुग्ण आढळले …..

कणकवली तालुक्यात 48 कोरोना रुग्ण आढळले …..

जनता कर्फ्यू करण्याची विविध संघटनांची मागणी; कोरोनाचा कहर…..

कणकवली :

कणकवलीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा कमी होत आहे. सोमवारी १६ सप्टेंबर रोजी ४८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.फक्त कणकवली शहरात २२ कोरोना बाधित आढल्याने खळबळ उडाली आहे.
बुधवारी दुपारी आलेल्या अहवालामध्ये सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कणकवली शहर २२,(त्यामध्ये बांधकरवाडी १०, बाजारपेठ १, गांगोवाडी ३, जळकेवाडी १, शिवाजीनगर ४, कनकनगर १, भालचंद्र नगर १, सोनगेवाडी १), कलमठ १५, हळवल ७, हरकुळ१, आशिये ३ मिळून ४८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत.
कणकवली तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या धोकादायक ठरत आहे. काल भाजपा सरचिटणीस सुदन बांदिवडेकर यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने आणखीनच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दर दिवशी वाढत असलेल्या संख्येमुळे प्रशासन हादरले आहे. कणकवली शहरातील २२ रुग्ण एका दिवशी आढळल्यामुळे जनता कर्फ्यू लावण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 3 =