चांदा ते बांदा योजना “रत्नसिंधू” म्हणून पुन्हा सुरू राहणार…

चांदा ते बांदा योजना “रत्नसिंधू” म्हणून पुन्हा सुरू राहणार…

दिपक केसरकर; राजकीय पक्षांना गाड्या देण्यापेक्षा शेतक-यांना गाई-म्हशी द्याव्यात…

सावंतवाडी

चांदा ते बांदा योजना बंद होणार नाही, तर रत्नसिंधु म्हणून ती पुन्हा सुरू होणार आहे. त्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी हिरवा कंदील दिला आहे, अशी माहिती माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान एखाद्या राजकीय पक्षाला गाड्या देण्यापेक्षा गरीब शेतक-याला गाई-म्हशी द्यावयात, असाही विरोधकांना चिमटा काढला.
शिवरामभाऊ जाधवांचे स्वप्न सतिश सावंत पुर्ण करीत आहेत.याचा मला अभिमान आहे,असे ही त्यांनी यावेळी सांगितले. माडखोल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा