You are currently viewing सिंधुदुर्ग जि. प. व पं. स. प्रभागांची प्रारूप रचना जाहीर

सिंधुदुर्ग जि. प. व पं. स. प्रभागांची प्रारूप रचना जाहीर

सिंधुदुर्ग :

 

जिल्हा परिषद निवडूकांची निवडणून प्रक्रिया प्रशासनाने हाती घेतली आहे. १० मे २०२२ च्या निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी जि.प. व पं.स. मतदार संघ व त्या मतदार संघात समाविष्ठ होणार्‍या गावे निश्चित केली आहे. सिंधुदुर्ग जि.प. चे पूर्वीचे ५० मतदार संघ आणखी ५ ने वाढले आहेत. तर पचायत समित्यांचे १०० मतदार संघ १० ने वाढले आहेत. त्यामुळे आगामी जि.प. व पं.स. निवडणूकीत जि.प. चे ५५ सदस्य व पं. स. चे ११० सदस्य कारभार पहाणार आहेत.

कोळपे, कोकिसरे, लोरे, खारेपाटण, कासर्डे, नांदगाव, फोडा, हरकुळ बुद्रुक, नाटक, जाणवली, कलमठ, कळसुली, विजयदुर्ग, पडेल, पोंबुर्ले, शिरगाव, नाडण, कुणकेश्वर, कींजवडे, मिठबाव, आडवली मालडी, शिरवंडे, आचरा, मसुरे मर्डे, सुकळवाड, गोळवण, पेंडूर, वायरी भूतनाथ, आंब्रड, कडावल, कसाल, ओरस बुद्रुक, नेरूर तर्फ हवेली, तेंडोली, झाराप, तुळसुली तर्फे माणगाव, नेरूरकर्यात नारूर, माणगाव, म्हापण, आडेली, तुळस, मातोंड, उभादांडा, शिरोडा, माडखोल, आंबोली, कोलगाव, तळवडे, माजगाव, ईन्सुली, मळेवाड, आरोंदा, बांदा मणेरी, साटेली भेडशी, माटणे असे ५५ जि. प. मतदार संघ निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी निश्चित केले आहेत. याबाबत नागरिकांच्या हरकती व सुचनांसाठी ८ जून पर्यन्त मुदत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − 2 =