You are currently viewing राज्‍य शासनाच्या नियोजनशून्यतेमुळे राज्‍यात वीज टंचाई – नीतेश राणे 

राज्‍य शासनाच्या नियोजनशून्यतेमुळे राज्‍यात वीज टंचाई – नीतेश राणे 

सिंधुदुर्गात लोड शेडिंग नको, वेगळे निकष हवेत

कणकवली

राज्‍य शासनाच्या नियोजन शून्यतेमुळे राज्‍यात वीज टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पर्यटन जिल्‍हा असलेल्‍या सिंधुदुर्गात अजिबात लोड शेडिंग होता नये. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वेगळे निकष हवेत अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी आज येथे केली.
येथील प्रहार भवनमध्ये त्‍यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, राज्‍यात कोळसा संपणार आहे हे राज्‍य शासनाला आधी कळायला हवे होते. तसे नियोजन त्‍यांनी करायला हवे होेते. पण मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री शांत बसून राहिले आणि आता कोळसा खाण खरेदी आणि इतर उपाय योजनांसाठी त्‍यांची धावपळ सुरू आहे. मात्र या कोळसा खरेदीमध्ये ही मोठा भ्रष्‍टाचार होण्याची शक्‍यता आहे.
ते म्‍हणाले,राज्‍यात कोरोना आल्‍यानंतर सहा महिन्यांनी राज्‍य शासनाने त्‍याविरोधात उपाययोजना सुरू केल्‍या. त्याच धर्तीवर आता कोळसा संपल्‍यानंतर राज्‍य शासनाला जाग आली आहे. मात्र ही जबाबदारीही घ्यायची त्‍यांची तयारी नाही. केंद्राने कोळसा दिला नाही, म्‍हणून लोड शेडिंग होत असल्‍याचा खोटा आरोप ते करत आहेत.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसाय होरपाळला आहे. त्‍यात आता लोड शेडिंग मुळे हा व्यवसाय पुन्हा संकटात येणार आहे. नुकतेच जिल्ह्यात आलेल्‍या पर्यटनमंत्र्यांनी पर्यटनाच्या अनुषंगाने विविध घोषणा केल्‍या. पण वीज नसेल तर पर्यटन प्रकल्‍प कसे राबवणार? याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करायला हवा. पर्यटन जिल्‍हा असणाऱ्या सिंधुदुर्गात लोड शेडिंग अजिबात होता नये. तर सिंधुदुर्ग साठी वेगळे निकष हवेत अशी आमची ठाम मागणी असल्‍याचे ही श्री.राणे म्‍हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − 2 =