You are currently viewing चिंदर येथे उद्या राँबिन्सन लोबो स्मृती चषक सेमी शुटिंग बाँल स्पर्धा

चिंदर येथे उद्या राँबिन्सन लोबो स्मृती चषक सेमी शुटिंग बाँल स्पर्धा

माऊंट कार्मेल आयोजित व हाँलीबाँल प्रेमी पुरस्कृत..

मालवण

चिंदर गावातील उत्कृष्ट शुटिंग बाँल संघाचा नेटमन तसेच ख्खातनाम आँलराऊंडर क्रिकेट पटू राँबिन्सन लोबो यांच्या स्मृती प्रित्यर्थ उद्या 20 मे रोजी व्हाँलिबाँल प्रेमी मित्रमंडळ पुरस्कृत व माउंट कार्मेल व सहकारी मित्र मंडळ आयोजित भव्य सेमी शुटिंग बाँल स्पर्धा चिंदर वड येथे आयोजित केल्या आहेत.

स्पर्धेत प्रथम पारितोषिक 5000 व चषक, द्वितीय 3000 व चषक, तृतीय 1000, चतुर्थ 1000 तर बेस्ट शुटर, बेस्ट लिफ्टर, बेस्ट नेटमन, शिस्तबध्द संघ अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. अधिक माहितीसाठी 9422834290 जाँन बाबा, 9420089816, जेरी 9403639144, टायसन 9422984240 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा