आम्ही बालकवी सिंधुदुर्ग संस्थेद्वारे होळी सणानिमित्त राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन….

आम्ही बालकवी सिंधुदुर्ग संस्थेद्वारे होळी सणानिमित्त राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन….

“आम्ही बालकवी सिंधुदुर्ग” या सामाजिक संस्थेद्वारे व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून होळी सणाच्या निमित्ताने राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दिनांक २८ व २९ मार्च २०२१ या दोन दिवशी प्राथमिक, माध्यमिक व खुलागट अशा तीन गटात घेतली गेली होती.
खुल्या गटातून सर्वोत्कृष्ट म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रीम.गौरी गोसावी यांनी सर्वोत्कृष्ट मानांकन मिळविले, तर माध्यमिक गटात अथर्व जोशी, मंडणगड याने प्रथम स्थान मिळवले, तसेच कु.वैभवी रेडकर, मुंबई हिने प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक मिळविला. या तीनही गटातून संप्रवी कशाळीकर,अविनाश ठाकूर,तन्वी पाटकर,सुनील मुळीक,मनिषा मालपुरे,अनुराधा उपासे,साहेबराव पवार,वैभव मोरे,सिद्धी सोसे,मधुरा गोंदाणे,लक्ष्मी रेड्डी,श्रेयसी महालकर यांनी सुद्धा विजेत्यांचा बहुमान पटकाविला.
या स्पर्धेचे परीक्षण श्री.दीपक पटेकर, सावंतवाडी यांनी केले तर आयोजन श्री.राजेंद्र गोसावी आणि मार्गदर्शन श्री.दीपक नागरे यांनी केले.
“आम्ही बालकवी” या संस्थेतर्फे नियमितपणे उपक्रम व स्पर्धा राबविण्यात येतात. संपूर्ण राज्यातून यामध्ये सहभाग घेतला जातो. तसेच महाराष्टातील सुप्त कलागुण असणाऱ्या परंतु आर्थिकदृष्ट्या हतबलता असलेल्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा