You are currently viewing स्वतःला पेटवून घेत तिरवडे-खारेपाटण येथे एकाची आत्महत्या…

स्वतःला पेटवून घेत तिरवडे-खारेपाटण येथे एकाची आत्महत्या…

वैभववाडी

तिरवडे तर्फ खारेपाटण येथील दयानंद बाबाजी तळेकर (वय ५५) यांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार दयानंद हे गेले काही दिवस नैराश्यामध्ये होते.

शुक्रवारी सायंकाळी त्यांची पत्नी सोबत राहात नसल्याच्या नैराश्यातून स्वतःला जाळून घेतले. यात ते पूर्णतः भाजले होते. नातेवाईकांनी त्यांना उपचाराकरिता तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारपूर्वीच मृत्यू झाला होता.

या घटनेची खबर त्यांचा भाऊ सदानंद बाबाजी तळेकर यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे. अधिक तपास भुईबावडा दूरक्षेत्र चे पोलीस हवालदार योगेश तांडेल करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 5 =