You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे

तिमिरातुनी तेजाकडे

शासकीय नोकरी बाबत परंपरागत न्यूनगंड व त्यांचे काही स्पष्टीकरण

शासकीय नोकऱ्या आहेत कुठे?

संपूर्ण भारतात युपीएससी, एसएससी, केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, बँका, स्वायत्त संस्था, महामंडळ त्याचप्रमाणे महाराष्ट्र मध्ये एमपीएससी तसेच राज्य शासनाच्या विविध विभागात दहावी ते पदवीधर, द्विपदवीधर, व्यवसायिक पाठ्यक्रम, आयटीआय उत्तीर्ण अशा सर्व शिक्षण घेतलेल्या व्यक्तींसाठी हजारो तसेच लाखोंच्या संख्येने विविध संधी असतात. परंतु फक्त घराच्या बाजूला नोकरी हवी असेल किंवा अभ्यास करून इतर जिल्ह्यातील किंवा राज्यातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करायची नसेल तर या नोक-यांकडे लक्ष कोण केंद्रित करेल?

👉 *मी उच्चशिक्षित नाही तर मला शासकीय नोकरी कशी मिळेल?*
काही वेळेस इयत्ता सातवी पासून दहावी, बारावी एवढे शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना सुद्धा विविध संधींच्या अनुषंगाने अर्ज करता येतो.

👉 *आता आमचे वय निघून गेले, आता कसा अर्ज करता येईल?*
बहुतांश राज्य शासनाच्या विभागांमध्ये कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये सूट सुद्धा असते परंतु तरीही बरेच उदासीनता बाळगून आहेत. ज्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे ते इतरांना प्रोत्साहन तरी देऊ शकतात.

👉 *महागडे क्लास लावण्याची माझी आर्थिक परिस्थिती नाही तर मला शासकीय कर्मचारी/ अधिकारी होता येईल का?*
तिमिरातुनी तेजाकडे या सामाजिक संस्थेचे विविध व्हाट्सअप तसेच टेलिग्राम चे समूह आहेत ज्यात जाहिराती, अध्ययन साहित्य, नोट्स, महत्त्वपूर्ण पुस्तके यांचे निशुल्क प्रसारण होते. स्वयम् अध्ययनाने भरपूर विद्यार्थी यश प्राप्त करतात.

इंटरनेटचा अनावश्‍यक वापर करण्यापेक्षा करिअरच्या तसेच ज्ञानाच्या दृष्टिकोनातून निरंतर विविध व्हाट्सअप तसेच टेलिग्राम समूहावर कार्यान्वित राहिले तर बरीचशी माहिती प्राप्त होऊन विविध ठिकाणी अर्ज करता येईल, कोठेही असला तरी विविध माहितीचे वाचन करता येईल, ज्ञान वाढवता येईल.

👉 *आमचं आता वय निघून गेलं आहे, आमची मुलेबाळे अजून लहान आहेत तर याचा आम्हाला काय फायदा?*
फायदा किंवा तोटा यापेक्षा जर आपणाला याची गरज किंवा आवश्यकता नसेल तरीही समाजामध्ये अनेक गरजवंत विद्यार्थी तसेच पालक वर्ग आहेत ज्यांच्या पर्यंत विविध संधीबद्दल माहिती पोहोचतच नाही. अनावश्यक माहितीचे प्रसारण करण्यापेक्षा इतरांचं भलं होऊ शकणाऱ्या अशा माहितीचे प्रसारण केल्यास गरजवंत व्यक्तींना याचा चांगल्या प्रकारे लाभ होईल.

👉 *मी उच्चशिक्षित आहे तर मी लहान पदांना अर्ज का करायचा?*
आजचे युग हे स्पर्धात्मक युग आहे, दहावी शैक्षणिक अर्हतेवर 100 गुणांची लेखी परीक्षा असली तरीही 100 पैकी 100 मार्क तर लांबची गोष्ट समाधान कारक गुण सुद्धा प्राप्त होत नाहीत. खोटे वाटत असेल तर आवर्जून एखाद्या पदांसाठी अर्ज करून आपल्याला किती मार्क मिळतात त्याची चाचणी करावी.

👉 *मी भरपूर परीक्षा दिल्या परंतु माझे सिलेक्शन होत नाही*
मुळात संबंधित विद्यार्थ्याने मोजक्याच परीक्षा दिलेल्या असतात, इतर विद्यार्थ्यांसोबत तुलना करता परीक्षांची संख्यासुद्धा कमी असते, अभ्यास तसेच नियोजनाचा अभाव सुद्धा असतो.

👉 *पुढील शिक्षण घेण्याची माझी आर्थिक परिस्थिती नाही*
विविध मुक्त विद्यापीठांमधून नाममात्र शुल्क भरल्यास विविध शैक्षणिक पाठ्यक्रमांना प्रवेश मिळतो, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना फ्रीशिप, स्कॉलरशिप ची सुविधा सुद्धा असते. विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ असेल तर काबाडकष्ट करून स्वतःची फी स्वतः भरू शकतात.

*तिमिरातुनी तेजाकडे च्या विविध समूहात समाविष्ट होण्यासाठी मला खालील क्रमांकावर वैयक्तिक संदेश पाठवावे, लिंक प्रदान केली जाईल*

सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 7 =