You are currently viewing नको कटू आठवणी

नको कटू आठवणी

गझल मंथन, गझल प्राविण्य, ग्रुप सदस्या ज्येष्ठ लेखिका गझलाकार, कवयित्री सौ शोभा वागळे यांची काव्यरचना

झालं गेलं विसरून जाऊ
सोडून देऊ कटू आठवणी
पुन्हा नव्याने आता करू
प्रेमाच्या गोड साठवणी

जीवन हे असतं क्षणभंगूर
आज असे तर उद्या नसे
आनंदाने क्षण घालवू सारे
गोडी गुलाबीने राहू कसे

दुःखा नंतर सुख येत असतं
का बाऊ करायचा दुःखाचा?
थोडी वेळ टळून गेल्यावर
मग येईल पाऊस सुखाचा.

राग राग कुणाचा करू नये
मवाळ प्रेमळ वाणी असावी
नेहमी सुख द्यावे सुख घ्यावे
अशीच आपली कार्ये करावी.

कडू गोड आठवणी असतात
गोड गोष्टीची करू साठवणी
बंध माया ममतेचे जपण्यासाठी
मनात नको कटू आठवणी.

© शोभा वागळे
© शोभाची लेखणी.

प्रतिक्रिया व्यक्त करा