You are currently viewing श्री गजानन विजय ग्रंथ

श्री गजानन विजय ग्रंथ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*

अध्याय विसावा
*श्री गजानन विजय ग्रंथ*

गजानन समाधिस्त
नुरे काही शेगांवात
परि अनुभव येतो
सत्य कथा विसाव्यांत ||

आली प्रचिती लक्ष्मणा
मुंबापुरी स्थानकात
एक भेटला संन्यासी
लाल केशरी वस्त्रात ||

देहयष्टी उंचीपुरी
तपतेज मुखावरी
जपे ओंकार वैखरी
मूर्ती ऐसी दिसे खरी ||

गोष्टी ओळखीच्या सांगे
म्हणे न व्हावे निराश
पेठकर नी बापट
आले होते प्रसादास ||

संन्याशाला नमस्कार
केला त्याने आदराने
गुप्त झाला “तो” लगेच
ओळखले लक्ष्मणाने ||

जोशी कसूर ग्रामाचा
भक्त समर्थांचा एक
“श्रींचे” दर्शन घेण्याचा
त्याचा विचार हा नेक ||

दाटी जलदांची नभी
घाले नदीत दमणी
अतिवेगे वर्षे मेघ
अकस्मात आले पाणी ||

क्षणांतच जोरदार
पूर नदीला हो आला
पुरातच अडकले
जोशी भयभीत झाला ||

भिती मरणाची वाटे
प्रार्थू लागे मनी श्रींना
आम्हा रक्षावे संकटी
आर्त साद माउलींना ||

ऐशा महापुरातूनी
गाडी आली पैलतीरी
पुरामाजी रक्षी भक्ता
सत्ता श्रींची चराचरी ||

ऐशी समर्थ प्रचीती
आली अनेका भूवरी
बोल त्यांचे”मी” येथेच
सत्य आहे खरोखरी ||

©️®️
सौ.मंजिरी अनसिंगकर ,
नागपूर.

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा