You are currently viewing वटपौर्णिमा

वटपौर्णिमा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वटपौर्णिमा*

 

सण वटपौर्णिमेचा

वड पूजती नारी

सात जन्म हाच

पती मागती सारी

 

वड वृक्ष डौलदार

त्याचा विस्तार फार

नसे चिंता सावलीची

लोंबे पारंब्याचे हार

 

जाती मुळे खोलवर

थांबवी जमिनीची धूप

वट पौर्णिमेस मिळे

देवासमान मान खूप

 

पाने,मुळे,पारंब्यात

असे औषधी गुणधर्म

हवेत पसरे ऑक्सिजन

जाणे झाडाचे हे मर्म

 

सुवासिनी भक्तिभावे

पूजन वडाचे करुनी

वडासारखे दीर्घायुषी

घेती सौभाग्य मागूनी

 

जीवनात सौख्य मिळो

वडासारखे विस्तीर्ण डेरेदार

भावना ही मनी जपूनी

पूजन करे सुवासिनी नार

 

साता जन्माची ती गोष्ट

खरी खोटी नाही जाण

नाते वडाशी जपूनीया

देऊ सौभाग्याचे वाण

 

©(दीपी)✒️

दीपक पटेकर, सावंतवाडी

८४४६७४३१९६.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा