You are currently viewing निरवडे श्री देव भूतनाथ मंदिराचा वार्षिक जत्रौत्सव आज

निरवडे श्री देव भूतनाथ मंदिराचा वार्षिक जत्रौत्सव आज

सावंतवाडी
निरवडेचे ग्रामदैवत श्री देव भूतनाथ मंदिराचा वार्षिक जत्रौत्सव आज मंगळवारी २९ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने हा उत्सव संपन्न होणार आहे. जत्रौत्सवानिमित्त सकाळ पासून मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी अभिषेक, पूजा त्यानंतर उत्सव मूर्ती पालखी मिरवणूक व ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. रात्री उशिरा कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 1 =