You are currently viewing शहरात तृतियपंथांचा महिला घरात एकटीच असल्याचे पाहून लुबाडण्याचा प्रयत्न

शहरात तृतियपंथांचा महिला घरात एकटीच असल्याचे पाहून लुबाडण्याचा प्रयत्न

शहरात तृतियपंथांचा महिला घरात एकटीच असल्याचे पाहून लुबाडण्याचा प्रयत्न

शहरात तृतियपंथांचा महिला घरात एकटीच असल्याचे पाहून लुबाडण्याचा प्रयत्न*

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातील द्वारकामाई इमारतीत सावंत नामक महिलेच्या सदनिकेत तीन तृतीयपंथी दरवाजा ठोठावून आत शिरले व घरात एकटीच महिला असल्याचा फायदा उठवत पहिल्यांदा पंचवीस हजाराची मागणी केली,ती महिला पाहून त्या तीन तृतीयपंथींना पाहून घाबरून गेली, अखेर त्यांच्याशी गया वया करून पाच हजार रुपये गुगल पे करत आपली सुटका करून घेतली.  महिलेने शेजारी राहणारे पोलीस प्रविण वालावलकर यांना माहिती देताच वालावलकर यांनी पोलीस स्थानकाची सूत्र हलवली व त्या तीनही तृतीयपंथींना ताब्यात घेतले आहे.

त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमोर त्या तिघांचा तात्काळ शोध घेऊ पोलीस ठाण्यात आणले. मात्र चौकशी अंति ते पुरुष असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले.

सावंतवाडी शहरातील नागरिकांनी या तृतीयपंथी बाबत सतर्कता पाळावी असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा