You are currently viewing वेंगुर्ले तालुका भाजपातर्फे पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार

वेंगुर्ले तालुका भाजपातर्फे पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार

वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुका भाजपातर्फे  शुक्रवारी १४ जानेवारी रोजी वेंगुर्लेतील पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार भाजपा प्रदेश कार्यालयीन सचिव शरदजी चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या या सत्कार समारंभ प्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, तालुका सरचिटणिस बाबली वायंगणकर,मच्छिमार नेते वसंत तांडेल, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत, उपाध्यक्ष के. जी. गावडे, अजय गडेकर आदी उपस्थित होते.

यावेळी वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीचा कै. प्रभाकर अनंत उर्फ शशिकांत केसरकर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त भरत सातोस्कर, कै. अरुण काणेकर स्मृती जेष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त मॅक्सी कार्डोज, कै. संजय मालवणकर स्मृती उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त विनायक वारंग, कै. सुमती गंगाराम सावंत स्मृती आदर्श महिला जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त सिमा मराठे, बाबासाहेब आंबेडकर स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त दिपेश परब, व सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा जेष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त महादेव उर्फ आपा परब यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी शरदजी चव्हाण, बाबली वायंगणकर, सुहास गवंडळकर, वसंत तांडेल यांनी  मनोगत व्यक्त करुन पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. सत्कारमुर्ती सिमा मराठे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार बाळू देसाई यांनी मानले.


वेंगुर्ले : वेंगुर्लेतील पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार करताना शरदजी चव्हाण,प्रसन्ना देसाई व अन्य

प्रतिक्रिया व्यक्त करा