You are currently viewing पोलिस ठाण्यांचा आवार की भंगार मालांची गोदामे…

पोलिस ठाण्यांचा आवार की भंगार मालांची गोदामे…

पुणे

अपघातग्रस्त वाहनांच्या बरोबरच, पोलिसांनी विविध गुन्हात जप्त केलेल्या वाहनांना ठेवण्यासाठी जिल्हातील सर्वच पोलिस ठाण्यांना हक्काचा भुखंड नसल्याने, पोलिस ठाण्याच्या आवारातच दाटीवाटीने अशी वाहने उभी करावी लागत आहेत. पोलिस ठाण्यांच्या आवारात उभी असलेल्या वाहनांच्या पैकी नव्वद टक्क्याहुनही अधिक वाहने भंगारात जमा करण्याच्या स्थितीत पोचली आहेत. यामुळे कामानिमित्त पोलिस ठाण्याच्या आवारात प्रवेश करणाऱ्यांना, ही पोलिस ठाणी आहेत की भंगार मालाची गोदामे असा प्रश्न पडत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 6 =