You are currently viewing पणदूरला 1 जानेवारीला विविध कार्यक्रम 

पणदूरला 1 जानेवारीला विविध कार्यक्रम 

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक – मालक संघटना, पणदूर तिठाच्या वतीने शनिवार दि. 1 जानेवारी 2021 रोजी पणदूरतिठा येथे प्रतिवर्षाप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये सकाळी 8 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, 10 वा श्रींची आरती व तिर्थप्रसाद, दुपारी 1 वा पासून ग्रामस्थांची सुश्राव्य भजने, सायंकाळी 7 वा. चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन पणदूर रिक्षा चालक – मालक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा