You are currently viewing सावंतवाडीतील दुकानांचे नामफलक मराठीत करा

सावंतवाडीतील दुकानांचे नामफलक मराठीत करा

मनसे पदाधिकाऱ्यांचे प्रशासनाला निवेदन

सावंतवाडी

सावंतवाडी शहरासह तालुक्यात अनेक दुकानांचे फलक इंग्रजी भाषेतील असून राज्य शासनाच्या दुकानवरील नामफलक मराठीत या निर्णयाची तात्काळ व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी सर्व दुकाने निरीक्षकांना अमलबजावणी लवकरात लवकर करण्याबाबत उचित आदेश देण्यात यावेत अशी मागणी मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून निवेदनाची प्रत सावंतवाडी तहसीलदार, डी वाय एस पी कार्यालय सावंतवाडी व सावंतवाडी नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आली आहे. तर मनसेला कायदा हातात घायवयास लावू नये असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

यावेळी यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर कार्याध्यक्ष संतोष भैरवकर उपशहर अध्यक्ष शुभम सावंत अभय देसाई बंटी गावडे मंदार सुभेदार आदी उपस्थित होते निवेदानात असे म्हटले आहे की राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या “दुकानावरील नामफलक हे मराठीत करावे” निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वागत करीत आहोत.

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत ‘मराठी भाषेसाठी आणि मराठी पाट्यासाठी अनेकवेळा आपल्या अंगावर ज्या केसेस घेतल्या आहेत त्याचे खऱ्या अर्थाने चीज झाले आहे. राज्य मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्थीचे विनयमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामुळे मोठ्या आस्थापनांसाहित छोट्या दुकानावरील नामफलक आता मराठीत करावे लागणार आहेत.

बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यांलगतच्या सर्वच दुकानावरील नामफलक मराठीत लागलेले दिसणे अपेक्षित आहे. सदर अधिनियमातील दुरुस्ती मध्ये मराठी-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीची तरतूद करून दुरुस्ती मंजूर करण्यात आली आहे.

तरी या आदेशाची सावंतवाडी शहरासह तालुक्यात लवकरात लवकर काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खळ-खट्याक स्टाईल आंदोलन हाती घेऊन मराठी भाषेव्यतिरिक्त अन्य भाषेत दुकाने फलक आढळून आल्यास मनसे स्टाईल ने उत्तर देऊ, असा इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 5 =