You are currently viewing विजयराव नाईक बी. फार्मसी महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के

विजयराव नाईक बी. फार्मसी महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के

यशस्वी विद्यार्थ्यांचे आमदार वैभव नाईक, स्नेहा नाईक यांनी केले अभिनंदन

कणकवली :

युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल महाविद्यालयाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी मार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेचा द्वितीय वर्ष सत्र – ४ बी. फार्मसीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेमध्ये युक्ता कुलकर्णी (९.७ ९ SGPA) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच प्रमदा नाईक(९.६४ SGPA) व प्रांजल घाडीगावकर (९ .५० SGPA) गुण मिळवून यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार वैभव नाईक, उपाध्यक्षा स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे, खजिनदार मंदार सावंत, प्राचार्य पूजा पटेल, बी. फार्मसी विभागप्रमुख प्रा. अमर कुलकर्णी व डी. फार्मसी विभागप्रमुख प्रा. चंद्रशेखर बाबर, प्रा. मेघा बाणे, प्रा. ऋषीकेश काटकर, प्रा. श्वेता पाटील, प्रा. निशा करंदीकर, प्रा. नमिता सागवेकर, प्रा. प्रणिता चव्हाण व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − one =