You are currently viewing फोंडाघाट सोसायटीमध्ये शासनातर्फे भात खरेदीचा शुभारंभ 

फोंडाघाट सोसायटीमध्ये शासनातर्फे भात खरेदीचा शुभारंभ 

शेतकऱ्यांनी संधीचा लाभ घ्यावा – राजन चिके.

गेले कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर फोंडाघाट विकास सेवा सोसायटी येथे चालू वर्षी शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या भाताच्या खरेदीचा शुभारंभ, चेअरमन राजन चिके यांनी वजन काट्याला पुष्पहार अर्पण करून, तर ज्येष्ठ नेते बबनमामा हळदिवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी हेमंत रावराणे, राजन नानचे, प्रसाद देसाई, विलास गुरव, विश्‍वनाथ जाधव, बंडु जाधव, नंदू जाधव सोनू कोकरे,गणेश इ. उपस्थित होते.

 

शासनाच्या भात पीक नोंदणीवर पर्याय काढण्यात आला असून शेतकऱ्यांना खरेदीसाठी आगाऊ रजिस्ट्रेशन करणे अत्यावश्यक आहे. त्यालाही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना हमीभावही चांगला देण्यात येणार आहे. या संधीचा शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन चेअरमन राजन चिकेयांनी केले.

गेल्या वर्षीप्रमाणे फोंडाघाट सोसायटीला भात खरेदी मध्ये प्रथम क्रमांक मिळू दे ,अशी प्रार्थना करताना शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी वेळेमध्ये आपले भात आणून सोसायटीला सहकार्य करावे अपेक्षा बबन मामा हळदिवे यांनी व्यक्त केली.

गेल्या वर्षी फेडरेशनने बजाज राईस मिलला सोसा.तर्फे शेतकऱ्यांकडून भात खरेदी केले होते.मात्र चालू वर्षी खरेदी भाताची व्यवस्था फोंडाघाट सोसायटीकडून कुडाळ शेतकरी खरेदी विक्री संघाकडे केली आहे, त्यामुळे हमीभावाची शासनाने जाहीर केलेली रक्कम, गेल्यावर्षी प्रमाणे तीन ते आठ महिन्यांनी जमा न करता त्वरित महिन्याभरात खात्यांवर जमा व्हावी ,अशी अपेक्षा फोंडाघाट मधिल शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे……

प्रतिक्रिया व्यक्त करा