You are currently viewing 15 सप्टेंबरच्या निषेध मोर्चाच्या नियोजनासाठी उदया माध्यमिक शिक्षक पतसंस्था सिंधुदुर्गनगरी येथे बैठकीचे आयोजन 

15 सप्टेंबरच्या निषेध मोर्चाच्या नियोजनासाठी उदया माध्यमिक शिक्षक पतसंस्था सिंधुदुर्गनगरी येथे बैठकीचे आयोजन 

15 सप्टेंबरच्या निषेध मोर्चाच्या नियोजनासाठी उदया माध्यमिक शिक्षक पतसंस्था सिंधुदुर्गनगरी येथे बैठकीचे आयोजन

कणकवली

गुजरात मधील बिल्कीस बानोवर झालेल्या अन्याय अत्याचार प्रकरणी आरोपींना सोडून देण्यात आले याचा निषेध करण्यासाठी तसेच राजस्थान मधील जालौर जिल्ह्यातील दलित चर्मकार समाजातील इंद्र मेघवाल या नऊ वर्षीय विद्यार्थ्याला तहान लागली असता , शाळेतील माठातील पाणी पिले म्हणून मनुवादी वृत्ती असलेल्या शिक्षकाने जबर मारहाण केली, त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. या घटनांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक , आणि राजकीय संघटनांच्या वतीने गुरुवार 15 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजताच्या निषेध मोर्चाच्या नियोजनासाठी बुधवार 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता महत्त्वाची बैठक माध्यमिक शिक्षक पतसंस्था सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

या सभेसाठी देवगड , वैभववाडी , कणकवली , मालवण , कुडाळ ,सावंतवाडी ,वेंगुर्ला ,दोडामार्ग तालुक्यातील सर्व सामाजिक , धार्मिक , राजकीय सांस्कृतिक आणि शैक्षणिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत .तरी सदर सभेस आपण उपस्थित रहावे . या मीटिंगसाठी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी ,भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग , कास्ट्राईब कर्मचारी महासंघ , सत्यशोधक सेक्युलर फ्रेंट, बौद्ध हितवर्धक महासंघ ,देवगड बौद्ध सेवा संघ, वैभववाडी सेवा संघ ,खारेपाटण बौद्ध सेवा संघ, मालवण तालुका बौद्ध सेवा समिती , दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग , कणकवली महाल बौद्ध सेवा संघ, निवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी महासंघ . सिंधुदुर्ग, समता प्रेरणा भूमी सिंधुदुर्ग , सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळ ,भारतीय चर्मकार समाज मंडळ , संत रविदास सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र, बामसेफ सिंधुदुर्ग, भारत मुक्ती मोर्चा सिंधुदुर्ग , बहुजन समाज पार्टी सिंधुदुर्ग , संविधानवादी संघटना तसेच शाहु ,फुले , आंबेडकरवादी विचाराच्या जिल्ह्यातील सर्व कर्मचारी संघटनांचे जिल्हाध्यक्ष ,तालुका अध्यक्ष आणि महत्वाचे पदाधिकारी यांनी सदर मोर्चाच्या नियोजन सभेला उपस्थित राहावे . असे आवाहन वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर,काट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्गचे संदीप लहू कदम,सत्यशोधक सेक्युलर फ्रंट
सुदीप कांबळे,बौद्ध सेवा संघ देवगड श्यामसुंदर जाधव / सुर्यकांत साळुंखे,भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम,चर्मकार उन्नती मंडळ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, संत रविदास सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप बांबर्डेकर,भारतीय चर्मकार मंडळ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + thirteen =