You are currently viewing हनुमान जयंती निमित्त दोडामार्गात विविध कार्यक्रमांचे आयोजन

हनुमान जयंती निमित्त दोडामार्गात विविध कार्यक्रमांचे आयोजन

दोडामार्ग :

 

दोडामार्ग येथे हनुमान जयंती निमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. ५ एप्रिल रोजी दुपारी १२ वा. हरिनाम सप्ताह प्रारंभ, सायंकाळी ७ वा. भजन, रात्री ९:३० वा. अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ला यांचा पंढरीचा पहिला वारकरी हा नाट्य प्रयोग, गुरुवार ६ एप्रिलला सकाळी ६ वा. हनुमान जन्मोत्सव, दुपारी १:३० वा. सप्ताह सांगता व महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. पावणीचा कार्यक्रम, रात्री ९ वा. महाबली हनुमान हा सिनेमा होणार आहे. या कार्यक्रमास भाविक व नाट्य रसिकांनी उपस्थित राहण्याच्या आवाहन हनुमान देवस्थान कमिटीने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा