You are currently viewing सावंतवाडी व वैभववाडी शिवसेना पदाधिकार्‍यांनी केला आ. वैभव नाईक यांचा सत्कार

सावंतवाडी व वैभववाडी शिवसेना पदाधिकार्‍यांनी केला आ. वैभव नाईक यांचा सत्कार

 

शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केले असताना देखील कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक हे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्यामुळे सावंतवाडी व वैभववाडी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी आज आमदार वैभव नाईक यांचा कणकवली विजय भवन येथे भगवी शाल घालून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आमदार वैभव नाईक यांनी केलेला संघर्ष त्यांनी शिवसेना पक्षाशी दाखवलेली निष्ठा आम्हाला प्रेरणादायी आहे. सावंतवाडी वैभववाडी मधील सर्व शिवसैनिक देखील शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार असून नेहमी शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ व वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी सांगितले.

 

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी,विधानसभा क्षेत्र प्रमुख विक्रांत सावंत, सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब, चंद्रकांत कासार, बाळा दळवी, सचिन देसाई, महिला आघाडीच्या अपर्णा खोटावळे,युवासेनेचे योगेश नाईक , पंकज शिरसाट, मदन राणे, विद्याधर परब, अजित राऊळ, शब्बीर मनियार, विनायक सावंत, संजय गवस, भगवान गवस

वैभववाडी येथील उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके,संदीप सरवणकर, जावेद पाटणकर, गौस पाटणकर, लोरे सरपंच विलास नावळे, युवासेना जिल्हा सचिव स्वप्नील धुरी, युवासेना तालुकाप्रमुख अतुल सरवटे, संजय चव्हाण, संतोष पवार, रोहित रावराणे, यशवंत गवाणकर, श्रीकांत डापळे, चंद्रकांत आमडोस्कर,दीपक गजोबार, शिवाजी राणे, अनिल नराम इतर शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =