You are currently viewing स्व. विराज नाईक

स्व. विराज नाईक

बारावा दिवस….पुण्यस्मरण

स्व.विराज सावळाराम नाईक हा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन पुणे येथील बजाज कंपनीमध्ये डिझायनर म्हणून कार्यरत होता. सावंतवाडीतील मिलाग्रीस हायस्कूल मधून दहावी उत्तीर्ण झाला. श्री पंचम खेमराज महाविद्यालय मधून बारावी पास झाल्यावर आपल्या आवडीच्या ऑटोमोबाईल क्षेत्रात त्याने करियर करायचे ठरविले. देवरुख येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधून ऑटोमोबाईल इंजिनिअर पदवी घेतल्यावर पुणे येथील बजाज कंपनीमध्ये डिझायनर म्हणून रुजू झाला.
आपल्या शांत व लाघवी स्वभावामुळे विराज हा लहानपणापासूनच नाईक कुटुंबातील सर्वांचाच लाडका होता. त्याच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
अवघ्या घराचा लाडका तू, नाही कोणी आम्हा तुझ्यासारखा. परत ये रे आमच्या विऱ्या, तू तर आमच्या जीवनाचा आसरा.
काहीसा भावनिक असलेला विराज सुट्टीच्या कालावधीत, गणेशोत्सवात गावी यायचा. आपल्या कामाप्रती प्रचंड आस्था असलेला विराज कंपनीमध्ये जास्त काम असताना कधी सुट्टीचा विचार देखील करत नव्हता. आपल्या कामात मग्न असायचा. कामाप्रती त्याची असलेली आस्था आणि प्रेम यामुळे कंपनीमध्ये देखील विराज सर्वांचा आवडता होता. लहानपणी माझा हात धरून विराज मिलाग्रीस शाळेत जायचा. आपल्या भावंडांमध्ये रमणारा विराज आज त्याच भावंडांना सोडून परागंदा झाला. शालेय आणि महाविद्यालयीन मित्रांशी त्याचे स्नेहाचे संबंध होते. मित्रांमध्ये देखील तो आपल्या स्वभावामुळे प्रिय होता.
विराजचे वय ते काय, अवघे ३७ वर्षे. आता कुठे त्याचं जीवन फुलू लागलं होतं.संसार वेलीवर दोन छानशी फुले ही आली होती. आपल्या परिवारासोबत आनंदी असायचा, रोज सकाळी शालेय,महाविद्यालयीन मित्रांनाही विराजचा “गुड मॉर्निंग” चा मेसेज न चुकता यायचाच. शनिवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२० ला सकाळी विराजचा “गुड मॉर्निंग” चा मेसेज आला नाही. आणि त्याच दिवशी शनिवारी अघटित घडले. पहाटे पाच वाजता विराजला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, आणि हसत्या खेळत्या नाईक कुटुंबातील लाडका विराज आपल्या कुटुंबाला पोरका करून जग सोडून गेला.
ऐन उमेदीच्या वयात आपल्या कुटुंबाला, छोट्या छोट्या लाडक्या मुलींना सोडून गेलेल्या विराजचा आठवणी तर कायमच येत राहणार,,,,, परंतु येणार नाही तो त्यांचा लाडका पप्पा…..
पुढील जीवनात त्याचा सहवास नक्कीच कुटुंबास लाभणार नाही, परंतु विराजचा स्मृती मात्र चिरकाल हृदयात घर करून राहतील.
आता सहवास जरी नसला तरी,
स्मृती सुगंध देत राहील.
जीवनाच्या प्रत्येक वळणावर मात्र…
आठवण तुझीच येत राहील..
तुझ्या स्मृती जतन करतच साश्रू नयनांनी तुला आज बाराव्या दिनी *भावपूर्ण श्रद्धांजली….

शोकाकूल…..
वडील- सावळाराम गंगाराम नाईक.
पत्नी- श्रीम.विभा विराज नाईक.
मुली- कु.विधी, कु.शर्वी
भाऊ- स्वप्निल
काका- मनोहर, सुनील, भिवा
काकी- श्रीम.स्नेहल उत्तम नाईक,
भाऊ- राजेश उत्तम नाईक (पत्रकार), विलास,मनीष,मयूर,सुमित,मंथन.
बहिणी- अनघा, सुरभी.
पुतणे- वेदांत, सृष्टी, वयनवी, अर्णव.
काकी- माधवी मनोहर नाईक,
काकी- शर्मिला सुनील नाईक.
वहिनी- साक्षी,कामिनी,सुवर्णा,अरुणा,स्वाती

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =